एरंडोल येथे ‘एक गाव एक गणपती ‘ अंतर्गत गणरायाची स्थापना (व्हिडिओ)

 एरंडोल, रतिलाल पाटील  ।  येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘एक गाव एक गणपती’ या संकल्पनेत अंतर्गत श्री गणरायाची स्थापना रा.ती. काबरे विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आली. यावेळी एरंडोल नगर पालिकेचे नगराध्यक्ष रमेश परदेशी यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करण्यात आली.

दरम्यान, सध्या सर्वत्र कोरोनाचे सावट असल्याने एरंडोल पोलीस स्टेशनतर्फे शहरातील प्रतिष्ठित नागरिक, शांतता कमिटीचे सदस्य व प्रमुख गणपती मंडळांची बैठक घेऊन ‘ एक गाव एक गणपती’ ची संकल्पना समजावण्यात आली. या संकल्पनेना सर्व गणपती मंडळांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले व त्याला मूर्त रूप आज श्री गणरायाची स्थापना करून देण्यात आले. याप्रसंगी प्रांताधिकारी विनय गोसावी,भाजपा संघटन मंत्री ad.किशोर काळकर,माजी नगराध्यक्ष देविदास महाजन,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विजय महाजन,माजी नगराध्यक्ष रविंद्र महाजन,माजी नगरसेवक जगदीश ठाकुर,नगरसेवक प्रा.मनोज पाटील,माजी उपनगराध्यक्ष आरती महाजन,युवासेनेचे शहराध्यक्ष अतुल महाजन,परेश बिर्ला,मोहन चव्हाण,शालिग्राम गायकवाड,राजू महाजन,अरुण माळी,शिवाजीराव अहिरार,नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक हितेश जोगी,आरोग्य निरीक्षक अनिल महाजन,माजी उपनगराध्यक्ष जहिरोद्दिन शेख कासम,गजानन पाटील, गोटू ठाकुर,रवि पाटील व पत्रकार आदी शहरातील मान्यवर उपस्थित होते.यावेळी पूर्ण दहा दिवस शहरात ‘ एक गाव एक गणपती ‘ मंडळातर्फे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत तसेच याठिकाणी शहरातील सर्व छायाचित्रकार दररोज आपली सेवा देणार आहेत.

सदर उपक्रम यशस्वितेसाठी एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव,पोलीस उपनिरीक्षक तुषार देवरे,सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अविनाश दहिफळे,पोलीस नाईक संदिप सातपुते,अनिल पाटील,पंकज पाटील,श्रीराम पाटील,विकास खैरनार,संतोष चौधरी,महेंद्र पाटील,राजू पाटील,किरण पाटील आदी पोलीस कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/527797341646163

 

Protected Content