Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एरंडोल येथे अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी

एरंडोल प्रतिनिधी । शहरातील साई गजानन कॉलनीत रस्त्याने पळत सुटलेल्या डुकराने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील रस्त्यावर पडल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. कुत्र्यांचा आणि डुकरांचा बंदोबस्त अद्याप झाला नसल्याने नागरीकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

एरंडोल शहराबाहेरील धरणगांव रस्ता आणि म्हसावद रस्त्यावरील बेवारस कुत्रे आणि डुकरे खुप जास्त झाली असून दररोज एक – दोन डुकरांचा कुत्रे फडशा पाडत असून लहान मुले आणि महिलांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.सरस्वती कॉलनी येथील रहिवाशी आणि नगरसेविका दर्शना ठाकुर यांनी देखील न.पा.मुख्याधिकारींकडे लेखी तक्रार केली होती परतू काहीही उपयोग होत नाही. 

धरणगांव रस्त्यालगत साईगजानन कॉलनीतील रहिवासी विजय जोशी ( महाराज ) हे आपल्या स्कूटी वाहनाने मंगल टाईल्सकडून दि . २१ रोजी धरणगांव रस्त्याने जात असतांना अचानक लक्ष्मीनगरकडून दुपारी डुकराच्या मागे धावत २/३ कुत्रे आले आणि गाडीवर आदळले.त्यामुळे विजय जोशी जोरात रस्त्यावर फेकले गेले व डोक्यावर पडले.त्यामुळे त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला व ते बेशुध्द झाले.परीसरातील नागरीक आणि रिक्षाचालकांनी त्यांना त्वरीत खाजगी दवाखान्यात हलविले परंतू गंभीर दुखापतीमुळे त्वरीत जळगांव येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी त्यांना दाखल केले.जोशी महाराज घरगुती जेवणाचे डबे पुरवून आपला उदरनिर्वाह चालवितात . त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांना दवाखाना खर्च जास्त अपेक्षित आहे . २/३ ऑपरेशन्स करावी लागणार असून एरंडोल शहरासह परिसरातून, जिल्ह्यातून दानशूरांनी मदतीचा हातभार लावल्यास जोशी महाराजांवरील जेवघेणे संकट टळू शकणार आहे . यासाठी अल्केश जोशी मो . ७०५८५८५३० ९ यांचेशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.एरंडोल न.पा.ने आतातरी दखल घेवून बेवारस कुत्र्यांचा आणि डुकरांचा बंदोबस्त करावा अशी नागरीकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे .

Exit mobile version