एरंडोल येथील प्रा.मनोज पटील यांना जळगाव जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

एरंडोल प्रतिनिधी । जळगाव जिल्हा शारीरीक शिक्षण व क्रिडाशिक्षक महासंघ यांच्यातर्फे एरंडोल येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. मनोज पाटील (मनोज पहेलवान)यांना जळगाव जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रा. मनोज पाटील हे महाराष्ट्र राज्य कुस्तीमल्लविद्या एरंडोल तालुका अध्यक्ष असुन त्यांचे क्रिडा क्षेत्राशी फार जुने नाते आहे. ते लहानपणापासून एक चांगले कुस्तीपटू आहेत. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना विद्यापिठात कुस्तीमध्ये प्रथम क्रमांक देखील पटकावला आहे. कुस्ती दंगल गावागावात जाऊन खेळल्या आहेत, छत्रपती क्रिडा मंडळाची त्यांनी स्थापन करुन त्यामार्फत त्यांनी मुलांसाठी १० लाखाची कुस्ती मॅट शासनाकडून मंजूर करून आणली आहे व त्या माध्यमातून त्यांनी अनेक राज्यस्तरीय खेळाडू घडवलेत. अगदी सुरवातीपासून त्यांना खेळाची खुप आवड आहे. क्रिडा क्षेत्रात जशी स्फुर्ती त्यांचाकडे आहे. ती फक्त खेळापूर्वी मर्यादित नसून त्यांनी याचा वापर राजकारणात देखील खुप चांगल्या प्रमाणे केला आहे. प्रा. मनोज पाटील पहेलवान व त्यांच्या आई सरला पाटील हे एरंडोल नगरपालिकेत नगरसेवक आहेत. या निवडीचे सर्वच स्तरातून कौतुक होत असुन प्रा.पाटील यांचे अभिनंदन होत आहे.

Protected Content