Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एरंडोल नगर पालिकेच्या अंजनी नदी स्वच्छता अभियनास प्रारंभ

एरंडोल प्रतिनिधी | नगर पालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या व शहरातील पर्यावरण प्रेमी मंडळींच्या मागणीनुसार आज दि.२३ जानेवारी रोजी पराक्रम दिनी लोकसहभागातून नदी स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

 

अंजनी नदी स्वच्छता मोहिमेची सुरुवात कासोदा रोड पुलापासून करण्यात आली. याप्रसंगी न.पा. मुख्याधिकारी तथा प्रशासक विकास नवाळे यांचे मार्गदर्शन खाली सर्व न. प. कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांनी युद्ध पातळीवर कामास प्रारंभ केला. याप्रसंगी नदीतील गाळ मशिनीद्वारे काढण्यात आला असून नदीच्या किनारचा परिसर देखील आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारा स्वच्छ करण्यात आला. पहिल्याच दिवशी ४० ट्रॅक्टर गाळ व ८ ट्रॅक्टर कचरा काढण्यात आला. नदी काठावर वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले . सदर मोहिमेस पर्यावरण दूत म्हणून सन्मानित केलेले डॉ. साळुंखे व डॉ. पवार यांनी देखील आपला सहभाग नोंदवला. यावेळी शहरातील सर्व नागरीक ,सर्व शासकीय कार्यालये, अधिकारी, कर्मचारी,पत्रकार , शिक्षक वृंद,सामाजिक मंडळ,तालीम मंडळे,सामाजिक कार्यकर्ते,एनजीओ यांनी देखील एरंडोल नगर पालिकेतर्फे चालविण्यात येणाऱ्या या मोहीमेत सहभागी व्हावे.असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक विकास नवाळे यांनी केले आहे. दरम्यान लोकसहभागातून अंजनी नदी स्वच्छता व नदीकाठी वृक्ष लागवड मोहीम दि. २३ जाने ( पराक्रम दिन) ते २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन सकाळी ७ ते १२ वाजेपर्यंत चार दिवस आयोजित करण्यात आली आहे.

Exit mobile version