Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एरंडोल तहसील कार्यालयात महसूल दिनानिमित्त रक्तदान शिबीर

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महसूल दिनानिमित्त येथील तहसील कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. २५ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.

 

महसूल दिनानिमित्त येथील तहसील कार्यालयात रक्तदान शिबीरासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासह उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या २८ पोलीस पाटील, कोतवाल, मंडळ अधिकारी, तलाठी लिपिक, अव्वल कारकून यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन तहसीलदार सुचिता चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले तर उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्या हस्ते करण्यात आला.

 

माधवराव गोळवळकर स्वयंसेवी रक्त संकलन केंद्र जळगाव चे तंत्रज्ञ मधुकर सैंदाणे, जनसंपर्क अधिकारी अर्जुन राठोड, मदतनीस श्रीकांत मुंडेले यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले यावेळी तहसीलदार देवेंद्र भालेराव व  किशोर माळी, विनायक मान कुंबरे, उदय निंबाळकर, सदानंद मुंडे, संदीप पाटील, अजय बिडवे, सलमान तडवी, नंदकिशोर शिंदे, प्रसाद दंडवते, मनोज शिंपी, अमोल पाटील, दीपक वाघ, नितीन महाजन, पुरवठा अधिकारी संदीप निळे ज्ञानेश्वर राजपूत ,एन आर वाघ कृपाचार्य , आदी कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version