‘एम्स’ रुग्णालयात पंतप्रधान मोदी यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

 

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नियमानुसार, कोविड लसीचा दुसरा डोस घेतलाय.  याबाबत पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावरून लस घेण्याचे आवाहन केले आहे. 

पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावरून त्यांनी कोविड लसीचा दुसरा डोस घेतल्याची माहिती दिलीय. दरम्यान, नरेंद्र मोदींनी १ मार्च रोजी लसीचा पहिला डोस घेतला होता. लसीकरण हे करोना विषाणूला हरवण्याचं आपल्याकडे असलेल्या काही उपायांपैंकी एक आहे, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी नागरिकांना लस घेण्याचं आवाहन केलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ लस घेतलीय. ‘आज मी एम्समध्ये कोविड १९ लसीकरणाचा दुसरा डोस घेतला. करोनाला हरवण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या उपायांपैकी एक उपाय लसीकरणाचा आहे. तुम्ही लस घेण्यायोग्य असाल तर लवकर लस घ्यावी’ असं म्हणत पंतप्रधानांनी को-विन वेबसाईटची लिंकही (CoWin.gov.in) आपल्याट्विटमध्ये जोडलीय.पंतप्रधानांना लस देण्याची संधी यावेळी पंजाबशी संबंधित नर्स निशा शर्मा यांना मिळाली. त्यांच्यासोबत सिस्टर पी. निवेदा यादेखील होत्या. या पंतप्रधानांनी करोना लसीचा पहिला डोस घेतला तेव्हाही पी. निवेदा या उपस्थित होत्या. 

 

‘आम्ही आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना करोना लसीचा दुसरा डोस दिला. त्यांच्याशी संवाद साधला. हा एक संस्मरणीय क्षण होता, कारण मला त्यांना भेटण्याचा आणि लस देण्याची संधी मिळाली’ असं निशा शर्मा यांनी मीडियाशी बोलताना म्हटलं.

 

Protected Content