Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एमपीएससी मुख्य परीक्षा : अनुसूचित जातीच्या उमेदवारांना अर्थसहाय्य

 

जळगाव,प्रतिनिधी । संघ लोकसेवा आयोगची नागरी सेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)तर्फे आर्थिक सहाय्य देण्यात येणार असून पात्र विद्यार्थ्यांना ८ डिसेंबरपर्यत अर्ज सादर करता येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणेमार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरीता स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीबाबत व प्रशिक्षणाकरिता दरवर्षी मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य देण्यात येते. संघ लोकसेवा आयोगातर्फे नागरी सेवा पूर्व परीक्षा दि. ४ ऑक्टोबर रोजी घेण्यात आली आहे. या परीक्षेचा निकाल दि. २३ ऑक्टोबर रोजी संघ लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे.
सन २०२० मध्ये अनुसूचित जातीचे विद्यार्थी संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा पूर्वपरीक्षा २०२० मध्ये उत्तीर्ण झाले आहेत व बार्टीचे पात्रेतेचे निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेकरिता एकावेळी एकरकमी ५० हजार आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहेत.
बार्टीमार्फत मुख्य परीक्षेकरिता देण्यात येणाऱ्या आर्थिक सहाय्यासाठी जे विद्यार्थी पात्र आहेत, त्यांनी बार्टीच्या संकेतस्थळाला भेट देऊन पात्रतेचे स्वरूप तपासून अर्ज डाउनलोड करून व अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून मेलवर दि. ८ डिसेंबर, २०२० रोजी सायंकाळी ५.३० मिनिटांपर्यंत अर्ज पाठविण्यात यावा असे आवाहन बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.

Exit mobile version