Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एमआयडीसी पोलीस ठाण्यात नवीन बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन

जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारात नवीन बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्याहस्ते रविवार ९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांच्याहस्ते कोनशिलाचेही अनावरण करण्यात आले.

जळगाव शहरातील सर्वात मोठी पोलीस स्टेशन म्हणजे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे नाव समोर येते. याठिकाणी अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या संकल्पनातून बहुउद्देशीय सभागृहाचे बांधकाम करण्यात आले. याचा उपयोग पोलिस कर्मचारी वर्गाला बंदोबस्त काळात मुक्काम कामी , पोलिस कर्मचारी बैठक, पोलिस पाटील बांधवांची बैठक या सभागृहाचा उपयोग होणार आहे.

या सभागृहाचे रविवारी ९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्याहस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. तर मान्यवरांच्याहस्ते कोनशिलाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, सुप्रीम कंपनीचे मुख्य व्यवस्थापक संजय प्रभूदेसाई, एचडी फायर प्रोटेक्ट कंपनीचे संचालक मिहीर घोटीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

बहुउद्देशीस सभागृह सुप्रीम इंडस्ट्रीज व एचडी फायर प्रोटेक्टर यांच्या सीएसएस फंड निधीतून उभारण्यात आले आहे. यावेळी सहाय्यक फौजदार तुकाराम निंबाळकर, सचीन घुगे यांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सुप्रीमचे जनरल मॅनेजर जी.के. सक्सेना, एच.डी. फायरचे जनरल मॅनेजर सुधीर पाटील, लघुउद्योग भारतीचे प्रमुख समीस साने, यांच्यासह पोलीस पाटील, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, बीनतारी संदेश विभागाचे अमित माळी यांनी केले. तर आभार सपोनि प्रमोद कठोरे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख, दिपक जगदाळे, रविंद्र गिरासे, निलेश गोसावी, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, विश्वास बोरसे, शिवदास नाईक, दिपक चौधरी, सचीन पाटील, योगेश बारी, मपोकॉ सपना येरगुंटला यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version