एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील आयोध्या नगरातील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड, लॅपटॉप आणि मोबाईल असा एकुण ४९ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले. या घटनेबाबत बुधवारी ८ मार्च रोजी दुपारी ४ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रविण सुधाकर इंगळे (वय-३४) रा. अयोध्या नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ते स्वॉप्टवेअर इंजिनिअर आहेत. ४ मार्च रोजी सकाळी १० वाजता ते घर बंद करून कामाच्या निमित्ताने बाहेरगावी गेले होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याचे पाहून आत प्रवेश करत घरातील लॅपटॉप, मोबाईल, रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकुण ४९ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार बुधवारी ८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता उघडकीला आला. त्यांनी घरात जावून पाहणी केली असता घरातील सर्व सामान अस्तव्यस्त करण्यात आला होता. त्यांनी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील करीत आहे.

Protected Content