Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एमआयडीसीतील कंपनीतून चोरट्याने लांबविले १२ लाख ६८ हजाराची रोकड

जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसीतील एका प्लॅस्टीक कंपनीतील बंद कॅबिनमधून अज्ञात चोरट्याने १२ लाख ६८ हजार रूपयांची रोकड लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. चोरी करतांना अज्ञात चोरटा हा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, भरत हरीष कुमार मंधान (वय-३५) रा. गोदडीवाला हॉसिंग सोसायटी मोहाडी रोड यांची एमआयडीसी तील सेक्टर व्ही २३ मध्ये स्वामी पॉलीटेक नावाची कंपनी आहे. या कंपनीत प्लॅस्टिक मोल्डेक फर्निचर बनविण्याचे काम केले जाते. ही कंपनी भाऊ आणि मावस भाऊ वासुदेव उर्फ विक्की विजू पमनानी असे मिळून भागीदारीत उभी केलेली आहे. कपंनीतील पहिल्या मजल्यावरील ऑफिसमध्ये १ ऑक्टोबरच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने स्क्रु ड्रायव्हर आणि हुक घेवून कॅबिन फोडून आत ठेवलेले १२ लाख ६८ हजारांची रोकड लंपास केल्याचे आज सकाळी उघडकीस आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दरम्यान, चोरी करतांना सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मध्यरात्री २.४१ वाजता कंपनीच्या कॅबिनमध्ये शिरला, कॅबीन स्क्रु-डायव्हरने घडण्याचा प्रयत्न केला असता उघता आले नाही. ३.३१ पर्यंत हा खटाटोप सुरू होता. त्यानंतर पॅट्रीमधून त्याने आत उडी घेतली. आणि ड्राव्हरमध्ये ठेवलेले १२ लाख ६८ हजार रूपये लंपास केले.

Exit mobile version