Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एमआयडीसीतील चटई दाणा कंपनीत साहित्यांची चोरी; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसी परिसरातील श्रीराम पॉलिमर्स या कंपनीत १३ हजार ६०० रुपये किंमतीच्या विविध साहित्यांची चोरी मंगळवारी २५ जानेवारी रोजी सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, निकीता राजेंद्र महाजन (वय-१९) रा. मेहरूण जळगाव यांची एमआयडीसीच्या व्ही सेक्टर मधील श्रीराम पॉलीमर्स नावाची चटई तयार करण्याकामी लागणाऱ्या दाण्याची कंपनी आहे. १७ जानेवारी रोजी निकीता आणि त्यांची आई सल्भा महाजन यांनी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास कंपनीतील काम बंद करून घरी गेले. या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी कूलूप तोडून कंपनीतून पाण्याची मोटर, शिलाई मशीन, दाणा मशिनचे दोन कटर, १०० मीटर वायर, दाणा मशिनला आवश्यक असणाऱ्‍या तिन पुली असा एकुण १३ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी नेल्याचे २० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता उघडकीला आले. प्रकरणी निकीता महाजन यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.

Exit mobile version