Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एमआयएम-भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू- सचिन सावंत

sachin sawant

मुंबई प्रतिनिधी । एमआयएम आणि भारतीय जनता पक्ष या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी करून या दोन्ही पक्षांवर जोरदार टीका केली.

सचिन सावंत यांनी एमआयएमचे नेते वारिस पठाण यांच्या चिथावणीखोर वक्तव्याचा प्रदेश काँग्रेसने तीव्र शब्दांत निषेध केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजप खा. प्रवेश वर्मा, गिरीराज सिंग इत्यादी भाजप नेत्यांनी ध्रुवीकरणाचा अजेंडा घेऊन जाणीवपूर्वक चिथावणीखोर वक्तव्ये केल्याचे पाहायला मिळते. पठाण यांचे वक्तव्यही याच पठडीतील आहे. यामागील अजेंडा या दोन्ही पक्षांनी मिळून एकत्रित तयार केलेला आहे, असा आरोप सावंत यांनी केला. याच मार्गाने देशाची फाळणी झाली होती. त्यावेळेस देशातील वातावरण गढूळ करण्याकरिता मुस्लिम लीग, हिंदू महासभा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या तीन शक्ती एकत्रित काम करत होत्या. एकमेकांच्या विरोधाचे नाटक करून हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग एकत्र सत्तेत सहभागीही झाल्या होत्या, असा दावा सावंत यांनी केला. चले जाव आंदोलनाचा विरोध करून यांनी ब्रिटिशांना साथ दिली आणि द्विराष्ट्रवादाचा सिद्धांतही मांडला हे ऐतिहासिक सत्य आहे. आज त्यांची जागा भाजप आणि एमआयएम ने घेतली आहे, असा आरोप सावंत यांनी केला. भाजप आणि एमआयएमच्या विभाजनवादी राजकारणाचा काँग्रेस धिक्कार करत सचिन सावंत यांनी या दोन्ही पक्षांवर याप्रसंगी जोरदार टीकास्त्र सोडले.

Exit mobile version