एप्रिलमध्ये रंगणार ‘युवारंग युवक महोत्सव’ – कुलगुरूंची माहिती(व्हिडिओ)

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | कोरोना काळातील नियमानुसार विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव होऊ शकला नाही. मात्र या वर्षी हा युवक महोत्सव घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

काल मंगळवार दि. २२ मार्च रोजी आंतरमहाविद्यालय युवक महोत्सव युवारंग-२०२१ च्या आयोजनासाठी समितीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत पुज्य साने गुरूजी विद्याप्रसारक मंडळाचे औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय व कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, शहादा यांनी दिलेल्या संयुक्त प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. यानुसार दि.१८ ते २१ एप्रिल,२०२२ या कालावधीत शहादा येथील पुज्य साने गुरूजी विद्याप्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात हा महोत्सव घेण्याचा निर्णय झाला आहे, असे कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेला प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.एस. टी. इंगळे, प्रभारी कुलसचिव प्रा. के. एफ. पवार, प्रभारी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. दीपक दलाल, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. सुनील कुलकर्णी, विद्यापीठ कार्यकारी अभियंता इंजि. एस. आर. पाटील हे उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/720296182663898

 

Protected Content