Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एन.व्ही रमण होणार सरन्यायाधीश

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । सरन्यायाधाशी बोबडे यांनी उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती एन.व्ही. रमण यांच्या नावाची केंद्राकडे शिफारस केली आहे.

 

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाल लवकरच संपणार असून, नवीन सरन्यायाधीश नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्र सरकारकडून सरन्यायाधीश पदासाठी नवीन नाव मागविण्यात आलं होतं.

 

सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाल पुढील महिन्यात अखेरीस म्हणजे २३ एप्रिल रोजी संपत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने नवीन सरन्यायाधीश निवडीची प्रक्रिया सुरू केली होती. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच सरन्यायाधीश पदासाठी नवीन नाव सूचवण्याची सूचना केली होती. केंद्रीय कायदा मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी  सरन्यायाधीश बोबडे यांना यासंदर्भात पत्र पाठवलं होतं.

 

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी सर्वात जास्त अनुभव असलेल्या न्यायमूर्तींची नियुक्ती केली जाते. सध्या शरद बोबडे यांच्यानंतर एन.व्ही. रमण हे सर्वाधिक ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. त्यामुळे सरन्यायाधीश बोबडे यांनी उत्तराधिकारी म्हणून रमण यांच्या नावाची केंद्राकडे शिफारस केली आहे.

Exit mobile version