Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एनएसयूआयच्या जिल्हाध्यक्ष भूपेंद्र जाधव यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात (व्हिडिओ)

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | एनएसयूआयच्या जिल्हाध्यक्षपदी रावेर तालुक्यातील रसलपूर येथील कार्यकर्ते भूपेंद्र श्रीराम जाधव यांचा पदग्रहण सोहळा काँग्रेस भवनात आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार हे होते. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष आ. शिरीष चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, महागराध्यक्ष शाम तायडे, जि.प. सदस्य प्रभाकर सोनवणे, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी, युवक जिल्हा उपाध्यक्ष हितेश पाटील, युवक काँग्रेस प्रदेश सचिव किरण पाटील, आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष दिलरुबाब तडवी उपस्थित होते.

प्रस्तावना रावेर सेवादलचे माजी तालुकाध्यक्ष भरत कुंवर यांनी केले. . मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन भूपेंद्र जाधव यांना पदग्रहण देण्यात आले.  तसेच युवक काँग्रेस प्रदेश सचिवपदी निवड झाल्याबद्दल किरण पाटील यांचाही मान्यवरांनी सन्मान केला. त्यानंतर सुलोचना वाघ, हितेश पाटील, शाम तायडे, प्रभाकर सोनवणे यांनी मनोगतातून भूपेंद्र जाधव याच्या माध्यमातून एनएसयूआय संघटनेचे कार्य जोमाने पुढे जाण्यासाठी संघटितपणे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. भूपेंद्र जाधव यांनी विद्यार्थी सभासद नोंदणीद्वारे पक्ष संघटन वाढविण्याची सुरुवात करणार असल्याचे सांगून जिल्हाध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल पक्षनेतृत्वाचे आभार मानले. प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील म्हणाले की, पक्षनेतृत्वाला बळकटी देण्यासाठी तसेच विद्यार्थी संघटन करून त्यांच्या समस्यांना न्याय देण्याकरिता झटण्याची महत्वाची जबाबदारी एनएसयूआय जिल्हाध्यक्षांकडे आली आहे. काँग्रेस पक्षाला पुढे नेऊन विद्यार्थी मतदार नोंदणी देखील करायची आहे. प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. शिरीष चौधरी यांनी, कार्यकर्ते घडविण्याची सुरुवात एनएसयूआयपासून होते असे सांगून तरुणांमध्ये बंधुभाव निर्माण करीत राष्ट्रसेवा हे उद्दिष्ट ठेऊन कार्य करावे असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरुन जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी, ते महाविद्यालयात विद्यार्थी प्रतिनिधी असल्याची आठवण सांगून एनएसयूआय संघटनेची कशी कार्यपद्धती चालते याची माहिती दिली. तसेच, सांस्कृतिक, क्रीडा, वादविवाद आदी स्पर्धेतून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व चौफेर फुलले पाहिजे असे सांगत काँग्रेसची डिजिटल सदस्य नोंदणी प्रत्येकाने करून घ्यावी असे आवाहन केले. सूत्रसंचालन विश्वजीत चौधरी यांनी तर आभार दिलरुबाब तडवी यांनी मानले. यशस्वीतेसाठी धनंजय चौधरी, मुजीब पटेल, मुंजलवाडीचे सरपंच योगेश पाटील, संदीप सइमिरे,सय्यद अहमद, सयुद शेख, आकाश धांडे, दीपक महाजन, राहुल पाटील, केतन पाटील, शोएब खान आदींनी परिश्रम घेतले.

 

Exit mobile version