Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एटीएम कार्ड ब्लॉक करण्याच्या बहाण्याने तरूणीची ऑनलाईन फसवणूक

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हरवलेले एटीएम कार्ड ब्लॉक करण्याबाबत गुगलवर जाऊन संपर्क क्रमांक मिळवणे तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. जळगाव शहरातील रचना कॉलनी येथील तरुणीची ९० हजार ५४५ रुपयांत फसवणूक केली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, जुना मेहरुण रोड परिसरातील रचना कॉलनीत दीक्षा आनंदा चौधरी (वय-२६) ही तरुणी कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. ती पुणे येथे आयटी कंपनीत नोकरीला असून सध्या घरूनच कंपनीचे काम करीत आहे. २२ फेब्रुवारी रोजी दीक्षा पांडे चौकातील एका बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेली. याठिकाणी ती एटीएम कार्ड विसरली. प्रकार लक्षात आल्यावर तरूणाला एटीएमचा शोध घेण्यासाठी पाठवले असता एटीएम कार्ड गहाळ झाल्याचे समोर आले. सदरची एटीएम कार्ड ब्लॉक करण्यासाठी दीक्षाने गुगलवरुन कस्टमर केअरचा नंबर मिळवला. त्यावर संपर्क साधला असता संबंधिताने दीक्षा हिला ओव्हलमध्ये एनी डेस्क नावाचे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले त्यानंतर डेबिट कार्डचा नंबर व सीवीवी नंबर विचारला. त्यानंतर काही वेळातच दीक्षाभूमीच्या मोबाइलवर तिच्या बँक खात्यातून (५९ हजार ९९८) व (३० हजार ५४७) रुपये काढण्यात आल्याचा मेसेज आला. अशाप्रकारे दीक्षाच्या बँक खात्यातून संबंधिताने एकूण (९० हजार ५४५) रुपये काढुन घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर दीक्षा हिने एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे हे करीत आहेत.

Exit mobile version