Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एचटीबीटी कापुस वाणाचे बनावट बियाणे विक्री करणाऱ्या विरुध्द गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अनधिकृत एचटीबीटी कापुस बियाण्यांची विक्री करणाऱ्या अमळनेर तालुक्यातील कळुबु येथील एका विरोधात मारवाड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शासनाकडुन मान्यता नसलेले व विक्रीस बंदी असलेले अनधिकृत एचटीबीटी कापुस बियाणे आणुन विक्री करणाऱ्या अमळनेर तालुक्यातील कळुबु येथील राजेंद्र धोंडुसिंह राजपुत यांच्या विरुध्द मारवड पोलीस स्टेशन येथे ९ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जळगाव अरुण श्रीराम तायडे , तत्र अधिकारी, विभागीय कृषि सहसंचालक नाशिक विभाग यांच्या समवेत आणि जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकुर, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने हि कारवाई केली. कृषि सहाय्यक गणेश पाटील, विद्या पाटील, कृषि विस्तार अधिकारी अमोल भदाणे, प.स. अंमळनेर यांच्या पथकाच्या सहकार्याने सापळा रचुन ६२ हजार ५०० रुपये किमतीचे ५० एचटीबीटी कापुस बियाणे पाकीटे जप्त केली आहेत. खरीप हंगाम मध्ये अनधिकृत एचटीबीटी, अवैधरीत्या व बिना बिलाने खरेदी करु नये, तसेच या बियाण्यांची कोणत्याही परिस्थितीत शेतकरी बांधवांनी लागवड करु नये, अशा कापुस वाणांची अनधिकृतपणे विक्री करत असल्याचे दिन आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकुर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Exit mobile version