Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एक स्पर्धा …. ” तहानलेल्या पक्ष्यांसाठी “

 

खामगाव  : प्रतिनिधी । लाॅयन्स क्लब संस्कृती (खामगाव ) व पक्षी मित्र संजय गुरव यांचा संयुक्त उपक्रम असलेली  “एक स्पर्धा तहानलेल्या पक्ष्यांसाठी” ही आगळी वेगळी स्पर्धा  १ ते १५ मे   या कालावधीत राबविण्यात येत असून ह्या स्पर्धेचे आयोजन सर्वांकरीता केलेले आहे.

 

आपल्या अंगणात, टेरेसवर किंवा गॅलरीत कावळा, कबुतर ,  पोपट , चिमणी , होला , सुगरण , चिरक , दयाळ , बुलबुल (लालबुड्या) ,  ब्राह्मणी  मैना , साळुंकी ,  सिंजीर ,  शिंपी असे  अनेक पक्षी संपूर्ण उन्हाळ्यात पाण्याचा शोधात भटकत येतात आणि असंख्य पक्षीप्रेमी त्याचेकरीता दाणा – पाण्याची सोयही करतात . तहानलेल्या पाखरांसाठी प्रत्येक व्यक्तीचे मनात प्रेमभावना उत्पन्न व्हावी म्हणून  येथील  लाॅयन्स क्लब संस्कृती (खामगाव ) व पक्षी मित्र संजय गुरव यांचा संयुक्त उपक्रम “एक स्पर्धा तहानलेल्या पक्ष्यांसाठी” ही आगळी वेगळी स्पर्धा  १ ते १५ मे   या कालावधीत राबविण्यात येत असून ह्या स्पर्धेचे आयोजन सर्वांकरीता केलेले आहे.

 

आपण  अंगणात मुक्या पाखरांकरीता पिण्याच्या पाण्याची सोय केली असेल तर त्या पक्षाचा पाणी पितानाचे एक सुंदर व बोलके छायाचित्र मोबाईल कॅमेराव्दारे घेवून  पुढील नमूद .क्रमांकावर आपले नाव, पत्ता तथा पक्षी कोणता आहे  ही माहिती   पाठवा.. या स्पर्धेचा मुख्य हेतूच प्रत्येकाने आपल्या अंगणात  पक्ष्यांसाठी  पाणवठे तयार करावे  हा आहे  ज्यांनी हा उपक्रम आपल्या घरी राबविला  अशा  सर्व सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहन मिळावे  म्हणून  सर्व सहभागी स्पर्धकांना आकर्षक प्रमाणपत्र व बक्षिसे आयोजन समितीकडून देण्यात येतील. सहभागी स्पर्धकांनी पक्षी पाणी पितानाचा फोटो प्रकल्प प्रमुख लाॅ.चेतन अग्रवाल मो.क्र.  (9765540110)  ,  लाॅ.विरेंद्र शहा मो.क्र.(7744005969), पक्षीप्रेमी किशोर भागवत  (9881680648), गौरव इंगळे मो.क्र. (7028999214) या क्रमांकावर पाठवून   स्पर्धा प्रवेश निश्चित  करावा  पक्षी संवर्धन जनजागृती करावी.अधिक माहितीसाठी कलाध्यापक संजय गुरव (मो.क्र. 9850664020.) यांच्याशी संपर्क साधावा , असे आवाहन करण्यात आले आहे

 

Exit mobile version