Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एकुलती येथील विवाहितेचा पैशांसाठी छळ

mahila

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील एकुलती येथील विवाहितेला ट्रॅक्टर घेण्यासाठी पन्नास हजार रुपये आणावे, शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात पतीसह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एकुलती येथे माहेर असलेल्या सुवर्णा पवन पाटील (वय-२४) यांचा विवाह पाचोरा तालुक्यातील आसनखेडे येथील पवन वामन पाटील यांच्याशी रीतीरिवाजानुसार झाला. लग्नाच्या सुरुवातीच्या काही दिवसानंतर पवन पाटील याने ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून विवाहितेने ५० हजार रूपये आणावे त्याचप्रमाणे व्यवस्थित स्वयंपाक करता येत नाही, असे टोमणे मारून तिला शिवीगाळ व मारहाण केले.

दरम्यान, विवाहितेने बाहेरून पैसे न आणल्याने सासू, सासरे, जेठ, जेठाणी, ननंद, नंदोई यांनी मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून विवाहिता जामनेर तालुक्यातील एकुलती येथे माहेरी निघून आल्या. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती पवन वामन पाटील, सासरे वामन मन्साराम पाटील, सासू सुमनबाई वामन पाटील, जेठ श्रावण वामन पाटील, जेठाणी दिपाली श्रावण पाटील, नंदोई प्रमोद हरी पाटील, ननंद वर्षा प्रमोद पाटील, नंदोई मनोज वामन जाधव यांच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार शशिकांत पाटील करीत आहे.

Exit mobile version