Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एकाच वर्षात चारदा होणार जेईई-मेन्स परीक्षा

नवी दिल्ली : अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणारी जेईई-मेन्स परीक्षा २०२१ पासून वर्षातून दोनदा नव्हे, तर चार वेळा घेण्यात येणार आहे.

याबाबत केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितले की, सध्या फेब्रुवारीत आयोजित पहिल्या सत्रातील जेईई-मेन्स परीक्षेसाठी नोंदणी सुरू असून, इच्छुक विद्यार्थी १६ जानेवारीपर्यंत नोंदणी करू शकतात. ही परीक्षा ऑनलाईन असेल. फक्त बी.आर्कची परीक्षा ऑफलाइन या प्रकारात घेतली जाणार आहे.

प्रत्येक परीक्षेचा निकाल परीक्षेच्या शेवटच्या दिवसानंतर ४ ते ५ दिवसांत जाहीर केला जाईल. निकाल घोषित झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुढच्या परीक्षेसाठी पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. दरम्यान, २०२१ मध्ये जेईई-मेन्स परीक्षा पहिल्यांदाच मराठी, असामिया, बंगाली, कन्नड, मल्याळम, ओडिया, पंजाबी, तामिळ, तेलगू आणि उर्दू भाषेत होईल. यापूर्वी ही परीक्षा इंग्रजी, हिंदी आणि गुजराती भाषेत घेतली जात होती.

आगामी वर्षात फेब्रुवारी : २३ ते २६ फेब्रुवारी; मार्च : १५ ते १८ मार्च; एप्रिल : २७ ते ३० एप्रिल आणि मे : २४ ते २८ मेे या प्रकारे चारदा परीक्षा घेतली जाणार आहे.

Exit mobile version