Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एकाच डोसमध्ये कोरोनाचा खात्मा

वॉशिंग्टन वृत्तसंस्था । आणखी एक कोरोना लस चाचणीच्या अंतिम टप्प्यात दाखल झाली आहे. अमेरिकन कंपनी जॉन्सन अॅण्ड जॉन्सनने चाचणी अंतिम टप्प्यात सुरू झाली आहे. फक्त एकाच डोसमध्ये कोरोनाचा खात्मा होऊ शकतो असा दावा कंपनीने केला आहे. सध्या सुरू चाचणीत लशीचे दोन डोस द्यावे लागतात. त्यानंतर अधिक प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते.

लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू झाली आहे. करोनावर मात करण्यासाठी लशीचा एकच डोस पुरेसा आहे का, याचाही अभ्यास करण्यात येणार आहे. एकाच डोसमध्ये करोनाला अटकाव करणे शक्य झाल्यास हे मोठे यश समजले जाईल. अंतिम टप्प्यात ६० हजारजणांवर चाचणी होणार असल्याचे जॉन्सन अॅण्ड जॉन्सनने स्पष्ट केले आहे. ही चाचणी अमेरिका, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, चिली, कोलंबिया, मेक्सिको आणि पेरू आदी देशांमध्ये होणार आहे. आतापर्यंत सुरू असलेल्या चाचण्यापैकी ही सर्वात मोठी चाचणी आहे.

जॉन्सन अॅण्ड जॉन्सनची लस इतरांच्या तुलनेत मागे असले तरी ही लस शून्य तापमानात ठेवण्याची आवश्यकता नाही. त्याशिवाय दोनऐवजी एकाच डोसमध्ये रोगप्रतिकारक शक्ती विकसित केली जाऊ शकते. .

अमेरिकेत संसर्गाने थैमान घातले आहे. अशातच अमेरिकेतील काही कंपन्यांनी लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. याला अमेरिकन सरकारनेही आर्थिक पाठबळ दिले आहे. फायजर आणि मॉडर्नाची लस या वर्षाखेर उपलब्ध होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

Exit mobile version