Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एकलव्य क्रिडा संकुलात राज्य स्पर्धेसाठी आंतरपरिमंडलीय क्रीडा निवड चाचणी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एकलव्य क्रिडा संकुल येथे नाशिक-जळगाव आंतरपरिमंडलीय क्रिडा निवड चाचणी स्पर्धेच्या उद्घाटन करण्यात आले.या निवड चाचणीसाठी जळगाव व नाशिक परिमंडळातील एकून १४८ स्पर्धक सहभागी झाले होते.

यावेळी जळगाव मंडळाचे प्रभारी अधिक्षक अभियंता राजेंद्र मार्के, धुळे मंडळाचे प्रभारी अधिक्षक अभियंता भिमराव मस्के, अहमदनगर मंडळाचे प्रभारी अधिक्षक अभियंता कैलास जमदाडे, जळगाव परिमंडळाचे सहाय्यक महाव्यस्थापक नेमिलाल राठोड, उपमुख्य औद्योगीक संबंध अधिकारी अरुण शेलकर, उपमुख्य औद्योगीक संबंध अधिकारी नाशिक परिमंडळ प्रमोद राजेभोसले, अभियंता संदिप शेंडगे, कनिष्ठ अभीयंता प्रदिप घुरड, जळगाव विभागाचे व्हि.बि.पाटिल, जनसंपर्क अधिकारी विकास आढे, व्यवस्थापक मंगेश गाडे यांच्यासह आदी उपस्थित होते.

दरम्यान, जिवनात कामासोबत खेळही महत्वाचे आहे; त्यामुळे निवड चाचणी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व क्रिडापटूंनी खेळाला खेळ म्हणून खेळावे असे आवाहन करत जळगाव येथे होत असलेली राज्यस्तरीय निवड चाचणी असल्याने यामध्यमातुन आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देऊन सर्व क्रिडापटूनी आपले उत्तम योगदान देण्याचे आवाहन करत सर्व क्रिडापटूंना मुख्य अभियंता जळगाव परिमंडळ कैलास हुमणे यांनी शुभेच्छा दिल्या.

जळगाव येथे पार पडलेल्या निवड चाचणीसाठी जळगाव व नाशिक परिमंडळातील एकून 148 स्पर्धक सहभागी झाले आहे. यावेळी स्पर्धेची औपचारीकरित्या उध्दाटन करतांना मुख्य अभियंता जळगाव परिमंडळ कैलास हुमणे व उपस्थित मान्यवर नाशिक-जळगाव परिमंडळ यांच्या दरम्यान कबड्डी, क्रिकेट, बॅटमेंटन, टेबल टेनिस ,रनिंग तसेच कॅरम सामना खेळत स्पर्धकात उत्साह भरण्यात आला.

Exit mobile version