Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एकनिष्ठ गोसेवा फाऊंडेशनची गायींवर उपचारांची धडपड

 

खामगांव:: प्रतिनिधी । गोसेवेत नेहमी अग्रेसर असलेल्या एकनिष्ठा गोसेवा फाउंडेशनकडून वेगवेगळ्या  घटनांमध्ये गंभीर झालेल्या ४  गायींवर उपचार करून ३ गायी वाचू न शकल्याने त्यांच्यावर अंतिमसंस्कार केले आणि  एका गायीला जीवदान दिले

 

तिलक मैदान भाजी मंडीस्थित एक लहान वासरू अपघातामुळे  जायबंदी  झालेले होते अनोळखी गोधारकाने वासरू बेवारस स्थितीत सोडून देऊन पोबारा केला होता. ही  माहिती  मिळाल्यावर गो सेवक पोहचले असता वासराचे लचके कुत्र्यानी तोडलेले होते  गोसेवकांनी खामगांव येथील गोरक्षण संस्थानमध्ये त्याला दाखल केले  आता त्याच्यावर डॉक्टर्स  उपचार करत आहे त्याची प्रकृती सुरळीत आहे.

 

वाडीस्थित पॉलिटेक्निक होस्टेलसमोर एका गाईला विषबाधा झाली होती डॉक्टरांना  बोलावून उपचारांचा प्रयत्न  केला परंतु ती गतप्राण झालेली होती  तिच्या मालकाच्या स्वाधीन करून अंतिम संस्कार करण्यात आले. सामान्य रुग्णालयात एका गायीला सर्पदंश झाल्यामुळे  तिच्यावर उपचार करण्यात आले परंतु ती गतप्राण झाली. रेलवेगेट साईनगरवाडीस्थित अनोळखी गोपालकाने गाय  मृत अवस्थेत टाकून दिली होती तिच्यावर  अंतिम संस्कार  करण्यात आले

 

या  सर्व घटनाबद्दल सामाजिक कार्यकर्ते सुरजभैय्या यादव यांनी नाराजी व्यक्त केली व गोधारकांच्या हलगर्जीमुळे गौ-वंश धोक्यात आहे असे  सांगितले . या गोसेवेत जितेंद्र कुलकर्णी, सतिष मोरे, प्रवीण खोंड, डॉ विवेक जोशी, दत्ता आमले, हर्षल खेडकर, करण परियाल, दिपक शर्मा, सत्येंद्र थानवी, रामा वाघ, सोनू ठाकुर, दिलीप चौधरी, विनोद नाईक, गोपाल पवार, अशोक कोरडे, रोशन शर्मा, कृष्णा गवळी, सुरज लहासे, जितेंद्र मच्छरे, अनिल चव्हाण, विशाल यादव, सागर हराळ, गणेश अपार, ज्ञानेश्वर हाड़े, तिवारी  आदी गोसेवकांनी वर्गनी गोळा करून गौ-वंशवर उपचार करून एका गायीला जीवदान दिले आणि तीन गायिंवर अंतिम संस्कार केले

 

Exit mobile version