Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एकनाथ खडसे यांचे कन्येसह स्व. गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन

परळी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आमदार एकनाथराव खडसे यांनी आपली कन्या रोहिणी खडसे यांच्यासह दिवंगत भाजप नेते गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन केले.

 

आमदार एकनाथराव खडसे व त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनी आज गोपीनाथ गडावर जाऊन दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन केले. आज मुंडे यांच्या नवव्या  स्मृती दिनानिमित्त गोपीनाथ गडावर त्यांच्या चाहत्यांची मोठी गर्दी उसळली आहे. दरम्यान, खडसे यांच्या सोबत माजी मंत्री तथा गोपीनाथरावांचे पुतणे आमदार धनंजय मुंडे हे देखील होते.

 

कालच आमदार एकनाथराव खडसे यांनी पंकजा मुंडे यांच्या अलीकडच्या वक्तव्यावर भाष्य केले होते. भारतीय जनता पक्ष तळागाळात पोहचवणार्‍यांची गळचेपी होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यानंतर त्यांनी आज गोपनीनाथराव यांना अभिवादन केले. तर, आजच ते पंकजा मुंडे यांची भेट देखील घेण्याची शक्यता आहे.

Exit mobile version