Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एकनाथराव खडसे यांच्या घराचे वीज बिल तब्बल १ लाख रुपये !

जळगाव (प्रतिनिधी) लॉकडाऊन काळात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगरातील घराचे वीज बिल तब्बल १ लाख चार हजाराचे बिल आले आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीचे बिल अवास्तव आहे, ते न भरण्यासारखे आहे, असे खडसे म्हणाले.

 

अवास्तव वीजबिलाच्या बाबतीत एकनाथराव खडसे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीचे बिल अवास्तव आहे, ते न भरण्यासारखे आहे. नागरिकांमध्ये बिलामध्ये सवलती, सूट द्या आणि अवास्तव बिलाच्या तपासण्या करा, अशी मागणी देखील खडसे यांनी केली आहे. दरम्यान, याआधी प्रसिद्ध गायिका अशा भोसले, अभिनेता अर्शद वारसी यांना देखील वाढीव बिल आहेत.

Exit mobile version