Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उस्मानिया पार्क परिसरात घरफोडी

जळगाव-ः प्रतिनिधी । शहरातील शिवाजीनगरचा विस्तारीत भाग उस्मानिया पार्कमध्ये अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडत साधारण १५ हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. यासंदर्भात अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

उस्मानिया पार्क येथील रहिवासी इम्तियाज हुकोमोद्दिन शेख हे आपल्या मेहुणीच्या मुलाच्या लग्नासाठी २२ नोव्हेंबर पासून मास्टर कॉलनी येथे सहपरिवार गेले होते. परंतु आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांना त्यांचे शेजारी समशोद्दिन शेख यांनी फोन करून सांगितले की, तुमच्या घराचा दरवाजा उघडा असून कुलूप तुटलेले आहे.

शेख हे तातडीने घरी पोहोचले आणि त्यानंतर घरात गेल्यानंतर त्यांना लक्षात आले की, अज्ञात चोरट्यांनी स्वयंपाक घरातून स्टीलच्या चौकोनी डब्यात ठेवलेले पगाराचे ७ हजार रुपये रोख, तसेच हॉलमधील एलजी कंपनीचा २२ इंची एलईडी टीव्ही, सॅमसंग कंपनीचा मोबाइल व एक ग्रॅम वजनाचा गळ्यातील मिक्स सोन्याचा हार लंपास केला आहे. इम्तियास शेख यांनी तक्रार दिल्यावरुन शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version