Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उस्मानिया पार्क परिसरातून मुलीला फुस लावून पळविले; शहर पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील उस्मानिया पार्क परिसरातून १७ वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळविल्याची घटना सोमवार १ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील उस्मानिया पार्क येथे १७ वर्षीय मुलगी आपल्या आईवडीलांसह राहते.  वडील मोलमजुरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. सोमवार १ मार्च २०२१ रोजी सकाळी ११ वाजता त्याची १७ वर्षीय मोठी मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याचे समोर आले. परिसर आणि नातेवाईकांकडे शोध घेवूनही मुलगी मिळून आली नाही. मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात भादवी कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि चंद्रकांत पाटील करीत आहे. 

Exit mobile version