Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उसनवारीच्या पैशांवरून एकावर चॉपरने वार

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील रायपूर कुसुंबा येथे उसनवारीचे पैसे मागण्याच्या कारणावरून तरुणावर चॉपर वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना सोमवारी १४ नोव्हेंबर रोजी रात्री घडली. याबाबत मंगळवारी १५ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील रायपूर कुसुंबा येथे पंकज गणपत साळुंखे (वय-३२) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांच्या शेजारी प्रमोद सोनवणे हे राहतात. तीन महिन्यांपुर्वी पंकज साळुंखे यांनी प्रमोद सोनवणे १ हजार रुपये उसणवारीने दिले होते. सोमवारी १४ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता उसनवारी दिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून पंकज साळुंखे यांच्या पत्नी दिपाली हिला प्रमोद सोनवणे याने मारहाण केली होती. याचा जाब विचारण्यासाठी पंकज साळुंखे गेला असता प्रमोद सोनवणे, तुषार प्रमोद सोनवणे, नकुल प्रमोद सोनवणे आणि कविता प्रमोद सोनवणे या सर्वांनी मिळून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, तर प्रमोद सोनवणे याने त्यांच्या हातातील चॉपरने पंकज साळुंखे याला गंभीर दुखापत केली. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचाराचा दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मंगळवारी १५ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता संशयित आरोपी प्रमोद सोनवणे, तुषार प्रमोद सोनवणे, नकुल प्रमोद सोनवणे आणि कविता प्रमोद सोनवणे सर्व रा. रायपूर कुसुंबा ता. जि. जळगाव यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुधीर साबळे करीत आहे.

 

Exit mobile version