Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उमेश नेमाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयास अविनाश आदिक यांची सदिच्छा भेट

भुसावळ प्रतिनिधी l येथील माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात पक्षाचे जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली.

 

याबाबत वृत्त असे की राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक यांचा जिल्हा दौरा नुकताच संपन्न झाला. त्यांच्या उपस्थितीत भुसावळ शहरात पक्षाची आढावा बैठक पार पडली. या बैठकी निमित्त शहरात आले असताना त्यांनी येथील माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट दिली. या कार्यालयात त्यांनी उमेश नेमाडे यांच्या कार्याविषयी माहिती जाणून घेत त्यांना आगामी वाटचालीबद्दल मार्गदर्शन केले. तसेच भुसावळ शहरात आणि विशेष करून आगामी नगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या रणनीती बद्दल सुद्धा या प्रसंगी चर्चा करण्यात आली. याप्रसंगी अविनाश आदिक यांच्यासोबत पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, महिला जिल्हाध्यक्ष मंगला पाटील, ज्येष्ठ नेते संजय पवार, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

Exit mobile version