Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उमेदवारी अर्जावर सहीसाठी ५० हजारांची मागणी : अत्तरदे दाम्पत्याचा आरोप (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उमेदवारी अर्ज छाननीत अर्ज वैध ठरावा म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी बिडवई यांनी आपल्याकडून ५० हजार रूपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक आरोप भाजपच्या जिल्हा परिषद सदस्या माधुरी चंद्रशेखर अत्तरदे यांनी केला आहे. यावरून जाब विचारत त्यांनी आपले पती चंद्रशेखर अत्तरदे यांच्यासह जिल्हा बँकेत ठिय्या मांडल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, Livetrends News जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवार दिनांक १८ ऑक्टोबर पर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतीम मुदत होती. तीन वाजेपर्यंत धरणगाव प्राथमिक सहकारी सोसायटी मतदारसंघातून फक्त संजय मुरलीधर पवार यांचाच अर्ज दाखल करण्यात आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्‍चीत झाली. तर, याच प्रमाणे पारोळ्यातून आमदार चिमणराव पाटील तर एरंडोलमधून त्यांचे चिरंजीव अमोल चिमणराव पाटील यांची देखील बिनविरोध निवड निश्‍चीत झाली आहे. याबाबत अधिकृत घोषणा नंतर करण्यात येणार आहे.

दरम्यान, यानंतर बुधवार दिनांक २० रोजी छाननी करण्यात आली. यात अनेक उमेदवारांच्या अर्जांवर आक्षेप घेण्यात आले होते. यात काही ठिकाणच्या उमेदवारांचे अर्ज बाद ठरले. यात सर्वसाधारण महिला प्रवर्गातून भारतीय जनता पक्षाच्या साळवा-साकरे गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. माधुरी चंद्रशेखर अत्तरदे यांचा अर्ज देखील बाद ठरविण्यात आला. याबाबतची माहिती मिळताच अत्तरदे दाम्पत्याने आतिशय आक्रमक पवित्रा घेतला. Livetrends News

याप्रसंगी नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे म्हणाले की, जळगाव जिल्हा बँक ही शेतकर्‍यांची बँक असून आम्ही सुध्दा शेतकरी आहोत. यामुळे निवडणुकीत माझ्या सौभाग्यवतीने अर्ज दाखल केला होता. मात्र यात सही सुटलेली असल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी आपल्याला ५० हजार रूपयांची मागणी केली होती. मात्र आपण हे पैसे न दिल्यामुळे आपला उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आल्याचा आरोप अत्तरदे दाम्पत्याने केला. जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया ही बोगस पध्दतीत राबविण्यात येत असून या संदर्भात आपण न्यायालयात जाणार असल्याचा इशारा चंद्रशेखर अत्तरदे यांनी दिला.

दरम्यान, माधुरी चंद्रशेखर अत्तरदे यांनी आपल्याला न्याय मिळावा या मागणीसाठी जिल्हा बँकेतच ठिय्या मारून आंदोलन सुरू केल्याने खळबळ उडाली आहे. जोवर आपल्याला न्याय मिळत नाही, तोवर आपण आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, हे आंदोलन सुरू झाल्यानंतर मुक्ताईनगर सोसायटी मतदारसंघातून अर्ज बाद करण्यात आलेले नाना पाटील यांनी आपण कर्ज घेतले नसतांनाही कर्जदार दाखविण्यात आल्याचा आरोप करत यात सहभाग घेतला. तर माजी आमदार स्मिता वाघ यांनीही गैरव्यवहाराचा आरोप केला. यासोबत भालोद येथील भारती नारायण चौधरी यांच्यातर्फे त्यांचे पती नारायण शशिकांत चौधरी यांनीही ठिय्या आंदोलनाच भाग घेतला आहे.

खालील दोन व्हिडीओंमध्ये पहा या नाट्यमय घटनेचे लाईव्ह प्रक्षेपण.

Exit mobile version