Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उमाळा येथून दुचाकी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर पोलीस स्टेशन मध्ये दाखल दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या संशयीताला एमआयडीसी पोलिसांनी शनिवार 11 मार्च रोजी दुपारी तीन वाजता जळगाव तालुक्यातील उमाळा येथून अटक केली आहे. भूषण उर्फ जिगर रमेश बोंडारे व 26 रा.उमाळा ता. जळगाव असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.

 

अमळनेर पोलीस स्टेशन येथे 25 जुलै 2022 रोजी दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल आहे . या गुन्ह्यात तब्बल आठ महिन्यांपासून फरार असलेला भूषण बोंडारे हा उमाळा या गावात त्याच्या घरी आल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद सिंग पाटील , पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश शिरसाळे,  पोलीस नाईक किशोर पाटील,  विकास सातदिवे , योगेश बारी, पोलीस कॉन्स्टेबल छगन तायडे, किरण पाटील यांच्या पथकाने शनिवार 11 मार्च रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास भूषण बोंडारे यास अटक केली. भूषण बोंडारे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर चोरी घरपोडी जबरी चोरी तसेच आर्म ॲक्ट असे एकूण 36 गुन्हे दाखल आहेत. पुढील कारवाईसाठी भूषण बोंडारे यास अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Exit mobile version