उभ्या ट्रकमधून सिमेंटच्या बॅगांची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील तरसोद फाट्याजवळ उभ्या ट्रकमधून ८५ हजार १९९ रूपये किंमतीचे ओरियंट सिमेंटच्या बॅग अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शनिवारी २५ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील शेख हनीफ शेख शफी (वय-३२) हे ट्रन्सपोर्ट व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता त्याचा ट्रकमध्ये ट्रान्सपोर्ट करण्यासाठी ओरीयंट सीमेंटच्या बॅग ठेवण्यात आले होते. हा नशिराबाद गावाजवळील तरसोद फाट्याजवळील सार्वजनिक ठिकाणी पार्कींग लावलेला होता. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ट्रकमध्ये भरलेले सिंमेटचे बॅग असा एकुण ८५ हजार १९९ रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेख हनीफ यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात जावून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनिवारी २५ फेब्रुवारी रोजी अज्ञात चोरट्यांविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ युनूस शेख करीत आहे.

Protected Content