Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उपसभापतीपदी जुम्मा तडवी यांची बिनविरोध निवड

रावेर, प्रतिनिधी । पंचायत समिती उपसभापती पदाचा पी. के. महाजन यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी जुम्मा तडवी यांची आज बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

उपसभापती पदाचा पी. के. महाजन यांनी राजीनामा दिल्याने जुम्मा तडवी यांनी उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला होता त्यांचा एकमेव उमेदवारी अर्ज अल्याने निवडणूक निर्णय अधिकारी उषाराणी देवगुणे यांनी त्यांची बिनविरोध निवडीची घोषणा केली.

विशेष घेण्यात आलेल्या सभेला सभापती जितेंद्र पाटील, सदस्य पी. के महाजन, योगेश पाटील, दिपक पाटील, कविता कोळी, माधुरी नेमाडे, धनश्री सावळे, प्रतिभा बोरोवले, योगिता वानखेडे, रुपाली कोळी आदी उपस्थित होते. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यानी फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

खासदार रक्षा खडसे ,माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, भाजपा उपाध्यक्ष पदमाकर महाजन, जिल्हा परिषद सदस्य कैलास सरोदे, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, माजी उपसभापती सुनील पाटील,सी. एस. पाटील, गोपाळ नेमाडे, कैलास सरोदे, शिवाजीराव पाटील, संदीप सावळे, हरलाल कोळी आदीनी अभिनंदन केले.

Exit mobile version