Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उपशिक्षक योगेश भालेराव आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयाचे उपशिक्षक योगेश भालेराव यांना राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार 2020 देऊन गौरव करण्यात आला.

राजनंदिनी बहुउउद्देशीय संस्था जळगाव तर्फे दरवर्षी देशाचे उज्ज्वल भविष्य घडविणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त करण्यात येतो. योगेश भालेराव हे नेहमी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी तप्तर असतात. वेळोवेळी पालकांचे मार्गदर्शन करतात.विवीध उपक्रम स्पर्धा राबवतात व नेहमी सहकार्याची भावना जोपासतात. सोबत ते महाराष्ट्रभर चालत असलेल्या बौद्ध समाज वधू वर परिचय ग्रुप व वेबसाईड जळगाव चे चे संस्थापक असून त्यांनी आतापर्यंत बरेचसे मुला मुलींचे लग्न जुळवून आणलेले आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन संस्थेचे अध्यक्ष एस.डी.वाघ यांच्यातर्फे त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

त्यांच्या या पुरस्काराबद्दल गौरी उद्योग समूहाचे संचालक सुमित पाटील, शाळेच्या मुख्या.रेखा पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

Exit mobile version