Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उपमुख्यमंत्र्यांनी वर्तवली पुन्हा लॉकडाउनची शक्यता

सातारा, वृत्तसेवा | कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ते सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना पत्रकारांशी बोलत होते.

 

राज्यात कोरोना रुग्णांची दिवसागणिक वाढत होत असल्याने संसर्ग रोखण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करायच्या याचा विचार सरकारी पातळीवर सुरू आहे. अजित पवार पुढे म्हणाले की, या संदर्भात मुख्यमंत्री जो निर्णय घेतील, त्याची अंमलबजावणी सर्व भागांत केली जाईल. पश्चिम बंगालमध्ये रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी लॉकडाउन केलं आहे. देशातील अनेक राज्यांत रात्रीच्या वेळेस लॉकडाउन करण्यात आलं आहे. कारण, जेवताना, चहापाण्याच्या वेळेस मास्क काढतो. एकमेकांच्या समोर येतो तेव्हा करोनाचा संसर्ग झपाट्यानं होतो. त्यामुळं या गोष्टी टाळणं नितांत गरजेचं आहे,’ असं अजित पवार म्हणाले. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आपण स्वत: काळजी घेत असल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.

Exit mobile version