Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उन्नाव बलात्कार प्रकरण : भाजपा आमदाराचे सदस्यत्व रद्द

mla sengar

 

उन्नाव (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातील बहुचर्चित उन्नाव बलात्कार प्रकरणातील गुन्हेगार म्हणून दोषी सिद्ध झाल्यानंतर भाजपा आमदार कुलदीप सेंगरचे विधानसभा सदस्यत्व रद्द झाले आहे.

 

याबाबत उत्तर प्रदेश विधानसभा प्रमुख सचिव प्रदीपकुमार दुबे यांनी अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेत म्हटलेय की, कुलदीप सिंह सेंगर उन्नाव जिल्ह्यातील बांगरमऊ विधानसभेतून निवडून आले होते. दिल्ली कोर्टात २० डिसेंबर २०१९ रोजी उन्नाव बलात्कार प्रकरणात त्यांच्या दोषारोप सिद्ध झाले आहेत. या प्रकरणात त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. १० जुलै २०१३ च्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कुलदीप सिंग सेंगर यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. दरम्यान, २०१७ मध्ये उत्तर प्रदेशात झालेल्या उन्नाव तरुणी अपहरण आणि बलात्कार प्रकरणात तीस हजारी कोर्टाने भाजपाचे निलंबित आमदार कुलदीप सिंह सेंगरला दोषी ठरवले होते.

Exit mobile version