Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उध्दव ठाकरे दुतोंडी साप : रामदास कदमांची शेलकी टिका

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | माजी मंत्री रामदास कदम यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर अतिशय शेलक्या शब्दांमध्ये टिका केली आहे.

 

एबीपी-माझा या वृत्तवाहिनीशी बोलतांना रामदास कदम यांनी ठाकरेंना लक्ष्य केले आहे. उद्धव ठाकरेंच्या बारसू दौर्‍यावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी टीकास्र सोडलं आहे. यावेळी रामदास कदम म्हणाले, माझं याबाबत स्पष्ट मत असं आहे की, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना स्वत: बारसूची जागा सुचवली होती. तसं त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्रही लिहिलं होतं. मग मुख्यमंत्री असताना एक भूमिका आणि मुख्यमंत्री पद गेल्यानंतर दुसरी भूमिका, असं का? कोकणात पाऊस आल्यानंतर सरडा जसा रंग बदलतो, तसं सरड्यासारखं रंग बदलण्याचं काम उद्धव ठाकरे करतायत का? आमच्या कोकणात दुतोंडी गांडूळ असतो, मग उद्धव ठाकरे दुतोंडी सापाची भूमिका बजावतायत का? असा प्रश्‍न त्यांनी विचारला आहे.

 

दरम्यान, रामदास कदम पुढे म्हणाले, जी गोष्ट तुम्हीच सुचवली जो प्रस्ताव तुम्हीच आणला त्यावेळी तुम्ही तेथील जनतेशी संवाद साधून हा निर्णय का घेतला नाही? हाही प्रश्न आहे. त्यामुळे हेतुपुरस्कर बारसूमध्ये लाठीचार्ज व्हावा, गोळीबार व्हावा, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा, एवढं करण्यासाठीच हा माणूस  इकडे येत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

Exit mobile version