Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उध्दव ठाकरे कफनचोर : देवेंद्र फडणवीस

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उध्दव ठाकरे हे कफनचोर असल्याचा आरोप करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडले आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून आक्रमकपणे ठाकरेंवर टिका करणारे फडणवीस यांनी त्यांना आज पुन्हा टार्गेट केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदर्शन वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी जम्बो कोविड सेंटर मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. त्यांना तर कफन चोर म्हणावे लागेल, असे म्हणत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

 

फडणवीस पुढे म्हणाले की, कॅगच्या वतीने अद्याप कोविड काळातील घोटाळ्यांचे ऑडिट करण्यात आलेले नाही. नॉन कोविड ऑडिटमध्येच बारा हजार कोटींचे घोटाळे समोर आले असल्याचा दावा, फडणवीस यांनी केला आहे. कोव्हिडच्या ऑडिटमध्ये आणखी किती घोटाळे समोर येतील त्यांच्यावर कारवाई करावीच लागणार आहे. हा जनतेचा पैसा होता, त्यांच्यावर आम्ही नक्कीच कारवाई करू, असा इशारा देखील त्यांनी दिला.

Exit mobile version