Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उधारीचे पैसे मागितल्याने धुळ्यात एकाला जिवंत जाळले

 

burn alive

 

धुळे (प्रतिनिधी) उसनवारी दिलेले एक लाख रुपये वारंवार मागतो म्हणून एकाला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील सोनगीर येथे घडली आहे. या घटनेमुळे गावात प्रचंड खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण आहे.

जिल्ह्यातील सोनगीर येथील नंदकिशोर पाटील यांनी घनश्याम गुजर याला एक लाख रुपये उसनवारीने दिले होते. नंदकिशोर हे घनश्यामकडे वारंवार पैशांची मागणी करत होते. मात्र तो ते पैसे देत नव्हता. अखेर संतप्त घनश्यामने आपल्या दोन साथीदारांना सोबत घेत नंदकिशोर यांना पेट्रोल टाकत जिवंत जाळले. उपचारादरम्यान नंदकिशोर यांचा मृत्यू झाला असून सोनगीर पोलिसांनी घनश्यामसह मंगेश आणि मख्खन गुजर या तिघांना अटक केली आहे.

Exit mobile version