Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उद्या स्व. चंदूलाल नेवे यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता शोकसभेचे आयोजन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील ज्येष्ठ पऋकार स्व चंदूलाल नेवे यांचे नुकतचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. नेवे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि यांच्याविषयीच्या भावना व्यक्त करण्यासाठी रविवार, २० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता कांताई सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले.

 

पत्रकारीतेव्यतिरिक्त स्व. चंदूलाल नेवे यांना समाजकार्याची मोठी आवड होती. वृक्षसंवर्धनाची त्यांची धडपड ही इतरांसाठी आदर्श अशीच होती. आणि अशाच वेगवेगळया प्रकारच्या सामाजिक कार्यामुळेही चंदूलाल नेवे यांची सामाजिक कार्यकर्ते समाजात अनोखी वेगळी ओळख होती. मितभाषी शांत, संयमी आणि मनमळावू असा त्यांचा स्वभाव होता. या स्वभावामुळे त्यांचा गोतावळा सुध्दा मोठा होता. अशा त्यांच्या गोतावळ्यातील ज्यांना स्व. चंदूलाल नेवे यांच्याविषयीच्या भावना व्यक्त  करता येणार आहे. यावेळी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असून सर्वांनी शोकसभेला उपस्थित राहावे, असे आवाहन नेवे यांच्या कुटुंबिय व मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले.

Exit mobile version