उद्या संत निरंकारी मंडळातर्फे रक्तदान शिबिर

अमळनेर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | संत निरंकारी मिशन आणि संत निरंकारी चॅरीटेबल फाउंडेशनतर्फे उद्या रविवार दि. १९ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना या शिबिराची माहिती व्हावी यासाठी आज शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली.

 

संत निरंकारी मिशनच्या वतीने आणि संत निरंकारी चॅरीटेबल फाउंडेशनतर्फे उद्या रविवार दि. १९ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत जनजागृतीसाठी आज शनिवार दि. १८ जून रोजी अमळनेर शहरातून सिंधी कॉलनी येथील निरंकारी सत्संग भवन येथून रॅलीस प्रारंभ करण्यातआला. रॅली पैलाड- बस स्थानक- महाराणा प्रताप चौक- रेलवे स्टेशन रोड- सुभाष चौक – गांधली पूरा मार्गे सत्संग भवन सिंधी कॉलनी येथे समारोप करण्यात आला. या शिबिर जनजागृती रॅली अमळनेरचे प्रमुख श्रीचंद निरंकारी ,निरंकारी सेवादल, प्रचारक, प्रबंधक, शिक्षक, संचालक आदींनी सहकार्य केले. उद्या रविवार दि. १९ रोजी सकाळी ९ वाजेपासून संत निरंकारी सत्संग भवन सिंधी कॉलनी चोपड़ा रोड या ठिकाणी धुळे नंदुरबार जळगाव झोनचे प्रमुख हिरालाल पाटील (झोनल इंचार्ज झोन 36B ) यांच्या उपस्थितित शिबिराला सुरवात होईल. रक्त संकलनासाठी जळगाव येथून रेड क्रॉस रक्तपेढी हे सम्पूर्ण टीम सह उपस्थित असणार आहेत. तरी या रक्तदान शिबिरासाठी जास्तीत जास्त रक्त दात्यानी रक्तदान करावे असे आवाहन संत निरंकारी मंडळ अमळनेरतर्फे करण्यात आले आहे.

 

Protected Content