Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत उद्या चाळीसगावातील पूरग्रस्त भागाची करणार पाहणी

जळगाव, प्रतिनिधी । शिवसेना नेते तथा संपर्क प्रमुख संजय सावंत यांचे जळगाव विमानतळावर आज सांयकाळी आगमन झाले आहे. त्यांचे शिवसेनेतर्फे स्वागत करण्यात आले.  उद्या ते चाळीसगाव तालुक्यातील पूरग्रस्तांना भेटणार आहेत. 

 

शिवसेना नेते तथा संपर्क प्रमुख संजय सावंत हे चाळीसगाव येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आलेले आहेत. ते उद्या रविवार दि. ५ सप्टेंबर रोजी चाळीसगाव येथे भेट देणार आहेत. आज जळगाव विमानतळावर संजय सावंत यांचे  स्वागत शिवसेना माजी महानगर प्रमुख गजानन मालपुरे , उपमहापौर कुलभूषण पाटील चेतन प्रभूदेसाई , नगरसेवक चेतन सनकत,लोकेश पाटील , सोहम विसपुते , राहुल नेरलेकर , जितेंद्र गवळी ,पूर्वेश पाटील, रोहन पराये , विलास भदाणे, नितीन राजपूत, सचिन चौधरी, धनंजय पाटील, राहुल खवडे ,खुशाल चौधरी, भुषण पाटील, विजय चौधरी व शिवसैनिक उपस्थित होते.

Exit mobile version