Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उद्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची महत्त्वपूर्ण बैठक

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांच्या नियोजनाकरिता उद्या सोमवार दि. १४ मार्च रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर उद्या सोमवार दि. १४ मार्च रोजी दुपारी ४ वाजता जयकिसन वाडी येथील पद्मालय विश्रामगृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची बैठक आयोजित केलेली आहे. या बैठकीस शहरातील सर्व आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन समितीचे प्रमुख मार्गदर्शक मुकुंद सपकाळे , उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश पगारे, उपाध्यक्ष सोनू आढाळे, सचिव पंकज सोनवणे, अजय गरुड यांनी केलेले आहे.

Exit mobile version