Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उद्यापासून १० वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा; शहरासह जिह्यात ७६१ केंद्रावर बैठक व्यवस्था

जळगाव. लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |   जिल्ह्यात १२ वीच्या ४ मार्चपासून परीक्षा सुरु आहेत. तर एसएससी १०वो बोर्डाच्या परीक्षा उद्या मंगळवार १५ मार्च पासून सुरु होत आहेत. या प्ररिक्षांसाठी जिल्ह्यात ७६१ केंद्रावर बैठक व्यवस्था करण्यात आली असून ५८ हजार विद्यार्थी होणार प्रविष्ट होणार आहेत.

 

राज्यात तसेच जिल्ह्यात संसंर्ग प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षापासून शैक्षणिक सत्रातील पदवी, पद्वुत्तर परीक्षा ऑनलाईन तसेच दहावी, बारावीच्या बोर्डाच्या मागील वर्षाच्या गुणांसह सरासरी गुण देऊन विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलण्यात आले होते. परंतू या वर्षी मात्र संसर्ग प्रादुर्भाव कमी झाल्याने महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासह दहावी बारावीच्या परीक्षा ऑनलाईन न घेता, नियमित ऑफलाईनद्वारा परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्यानुसार जिल्ह्यात २८२ केन्द्रावर ४ मार्च पासून १२ वी बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. तर मंगळवार १५ मार्च पासून १० वीच्या परीक्षा सुरु होणार आहेत. यापरीक्षासाठी जिल्ह्यातून या परीक्षेसाठी जिल्ह्यातून ५८००० विद्यार्थी प्रविष्ट होणार असून विद्यार्थ्यांची थर्मल गनद्वारे तापमान तपासणीसाठी आरीग्य पथक जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या यांच्या सुचनेनुसार तैनात करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने संसर्ग प्रादुर्भाव उपाय योजना अंमलबजावणीसह प्रत्येक तालुकानिहाय तहसील स्तरावर परीक्षा केंद्रावर भरारी पथक तैनात करण्यात आले असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी दिली. यावर्षी एसटी महामंडळाच्या बसेसचा संप वाहनांची उपलब्धता नसल्याची शक्यता तसेच संसर्ग प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर दहावी बोर्डाच्या परीक्षांसाठी यावर्षी अर्धा तासाची वेळ वाढवून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी वेळेपूर्वी केंद्रावर उपस्थित राहावे, असे आबाह्न माध्यमिक शिक्षण आणि जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Exit mobile version