Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उद्यापासून शरद पवार यांचा नुकसानग्रस्त भागांचा पाहणी दौरा

 

मुंबई, वृत्तसंस्था । परतीच्या पावसाने शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूरमध्ये शेतकऱ्याच्या समोर ऐन हंगामात हातात आलेले पिकं डोळ्यसमोर पाण्यात वाहून गेले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करणार आहेत.

राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे बळीराजाला मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेली सोन्यासारखी ऊस, कापूस, तांदूळ, सोयाबीनची पिकं पाण्यात वाहून गेली आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी अतिवृष्टी भागाचा आढावा घेतला. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठवाड्याचा दौरा करण्याचे नियोजन केले आहे. शरद पवार हे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तुळजापूर, उमरगा,औसा, परांडा, उस्मानाबाद भागाची पाहणी करणार आहे. उद्या रविवार 18 ते सोमवार 19 ऑक्टोबर दौरा करणार आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेताची पाहणी करणार आहे. पहिल्या टप्प्यात हा त्यांचा दौरा असणार आहेत.

Exit mobile version