Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उद्यापासून पहिली ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम दूरदर्शन चॅनलवर

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ऑनलाईन अभ्यासक्रमावर अधिक भर देण्यात येत आहे. आता विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनवर उद्या 20 जूनपासून पहिली ते बारावी अभ्यासक्रमवर कार्यक्रम प्रसारीत होणार आहे.

कार्यक्रामाच्या वेळा याप्रमाणे राहणार आहे. सकाळी १०.३० ते ११ वाजेदरम्यान पहिली ते पाचवी, ११ ते १२ दरम्यान सहावी, सातवी , आठवी, नववी व अकरावी, आणि दुपारी १ ते २ वाजेदरम्यान दहावी व बारावीचा अभ्यासक्रमांबाबत प्रसारित करण्यात येणार आहे. दरम्यान शासनाने पहिली ते बारावीची सर्व पुस्तकांची पीडीएफ उपलब्ध करून दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना हवी असेल त्यांनी डाऊनलोड करून घ्यावे. दरम्यान आपल्या शेजारी असलेल्या विद्यार्थ्यांना सोबत दिलेली लिंक पाठवावे असे आवाहन शालेय शिक्षण विभागाने केली आहे. लॉकडाऊन काळात एक उत्तम पालक म्हणून आले कर्तव्य पार पाडा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version