Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत स्वर्गीय आर.ओ. तात्या पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव रोडवरिल निर्मल सिडस् येथे रविवारी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आगमन झाल्यानंतर याठिकाणी स्व.आर. ओ. (तात्या) पाटील यांचा स्मृती अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी स्व. आर. ओ. (तात्या) पाटील यांच्या ११ फुटी पुतळ्याचे आनावरण निर्मल स्कुल संपन्न झाले. यावेळी जैव तंञज्ञान प्रयोगशाळेचे उद्धघाटन देखील करण्यात आले.

या कार्यक्रमास खा. संजय राउत, खा. अरविंद सावंत, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, शिवसेनेच्या नेत्या सुष्मा अंधारे, जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, जिल्हा प्रमुख डॉ. हर्षल माने, अमळनेर येथील आमदार अनिल पाटील, निर्मल सिडस् चे जेष्ठ संचालक डॉ. सुरेश पाटील, डॉ. जे. सी. राजपुत, दिलीपराव देशमुख, वैशाली सुर्यवंशी, स्व. आर. ओ. तात्या यांच्या पत्नी कमलताई पाटील, महाव्यवस्थापक सुरेश पाटील, प्रमोद दळवी, रवी चौरपगार, माजी आमदार दिलीप वाघ यांच्यासह सह पाचोरा भडगाव तालुक्यातील कृषितज्ञ, आदर्श शेतकरी, डॉक्टर, वकिल, शिक्षक, मेडिकल असोशिएशनचे पदाधिकारी, कृषी सेवा केंद्रांचे संचालक, निर्मल सिडस् चे डिलर, व्यापारी, राजकिय, सामाजिक व विविध क्षेञातील मान्यवर व महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या.

यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे यांनी बोलतांना सांगितले की, केंद्र सरकारने विनाटॅक्स ५५ हजार गाठी आयात करून शेतकर्‍याच्या कापसाचे मोठे नुकसान केले. शरद पवार हे केंद्रात कृषीमंञी असतांना व महाविकास आघाडीचे राज्यात सरकार असतांना या दोन्ही वेळा शेतकर्‍यांच्या हिताचे खर्‍याअर्थाने निर्णय घेण्यात आले. आता माञ केंद्र व राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या पदरात धोंडा टाकला आहे. आर. ओ. (तात्या) पाटील यांची सुकन्या वैशाली सुर्यवंशी हीला मी अगदी लहानपणी पाहिले असतांना त्याचवेळी तिच्यातिल आर. ओ. तात्यांप्रमाणेच गुण हेरले होते. वैशाली ही आर. ओ. पाटलांच्या पावलावर पाऊल ठेऊन चालणारी एकनिष्ठ जिद्दी व चिकाटी असलेली कन्या असल्याने आर. ओ. तात्यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आपण सर्वांनीच तिला आर्शिवाद द्यावे ही या क्षणाला मी अपेक्षा व्यक्त करित आहे.

राजकारणात अनेकवेळा शेतकरी हिताचे निर्णय निवडणुकीच्या तोंडावर घेतले जातात. शेतकर्‍यांचा वापर अनेक लोक केवळ खुर्ची आणि सत्तेसाठी करतात. माञ आर. ओ. (तात्या) पाटील हे शेतकरी जगला तरच देश वाचेल या दृष्टीकोणातुन सतत शेतकर्‍यांच्या प्रश्नावर झटत असत. केवळ माझा शेतकरी आणि त्याच्या शेतीच्या विकासाला चालना मिळाली पाहिजे. शासनाने कमी खर्चात अधिक उत्पन्न देणार्‍या वाणाची निर्मीती करण्याचे ते स्वप्न पाहायचे. त्यांनी सतत शेती आणि शेतकर्‍यांचा ध्यास घेतल्याने शेतकर्‍यांचा खरा मिञ म्हणुन त्यांची ओळख निर्माण झाली होती. त्यामुळेच त्यांनी देशात पहिल्या व आशिया खंडात दुसर्‍या जैव तंञज्ञान प्रयोगशाळा काढुन निर्मल सिडस् चे नाव जागतिक पातळीवर नेउन पोहचविले आहे. मला आज या लॅबचे उद्घाटन करतांना जितका आनंद होत आहे. तितकाच त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करतांना माझे अंतरकरणाला दुःख होत आहे. असे अतिशय भाऊक शब्दात माजी मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी निर्मल सिडस् चे संचालक डाॅ. सुरेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. तर महाव्यवस्थापक सुरेश पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातुन निर्मल सिडस्चा लेखाजोखा सादर केला.

Exit mobile version