Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उद्धवा अजब तुझे सरकार !: किरीट सोमय्यांचा खोचक टोला

kirit somayya

मुंबई । कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणावरून महाआघाडीतील विसंगतीवर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी उध्दवा अजब तुझे सरकार ! असा खोचक टोला लगावला आहे.

भीमा-कोरेगाव हिंसाचाराचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएकडे वर्ग करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. तसेच, माझा निर्णय फिरविण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी सांगितले होते. यावरूनच उद्धवा अजब तुझे सरकार असा खोचक टोला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लगवाला आहे.

सोमय्या यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, भीमा कोरेगाव प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार २२ डिसेंबरला सांगतात एसआयटीमार्फत चौकशी करावी. त्यांनतर २३ जानेवारीला याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार पोलिसांना निर्देश देतात. तर लगेच २४ जानेवारीला शरद पवार मुख्यमंत्री यांना पत्र पाठवतात. पवारांनी पत्र पाठवताच दुसर्‍या दिवशी २५ जानेवारीला एनआयए हा तपासा स्वता:कडे घेण्याचा प्रयत्न करतात.

एनआयएकडे तपास वर्ग होत असल्याने २७ जानेवारीला राज्य सरकार कडाडून याला विरोध करतात. पुढे हे प्रकरण न्यायालयात गेले. त्यांनतर आता १३ फेबुवारीला महराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख सांगतात की मुख्यमंत्री यांनी निर्देश दिले आहे की, हे तपास आता एनआयएकडे वर्ग करण्यात यावे. त्यामुळे उद्धवा अजब तुझे सरकार असे म्हणत किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला टोला मारला आहे.

Exit mobile version