Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उदयनराजेंच्या उमेदवारीला काकडेंचा विरोध

0Udayanraje Bhosale 35

पुणे प्रतिनिधी । उदयनराजे भोसले यांना भाजपतर्फे राज्यसभेची उमेदवारी मिळण्याचे संकेत मिळाल्यानंतर पक्षाचे सहयोगी सदस्य संजय काकडे यांनी कडाडून टीका केली आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले यांचा भाजपच्या तिकिटावर काही दिवसांपूर्वीच पराभव झाला होता. यानंतर भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी सुरु आहे. आता त्यावर भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, उदयनराजे फक्त भोसले आहेत म्हणून सरस होऊ शकत नाहीत. भारतातला मी एकमेव असा माणूस आहे की अपक्ष असतानाही निवडून आलो. ते छत्रपतीचे वंशज असले तरी आम्हीही महाराजांच्या सरदारांचे वंशज होतो. आपण स्वतः भारतीय जनता पक्षाचे दीड लाख सभासद नोंदवले आहेत. २०१९ ची लोकसभा असो अथवा विधानसभा असो, देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आदेश मी पाळले.त्यामुळे राज्यसभा मलाच मिळेल मला फडणवीस डावलतील असं वाटतं नाही, डावलल्यावर बघू. परंतु माझ्यासाठी तेच मोदी आणि शहा आहेत असे काकडे म्हणाले.

दरम्यान, उदयनराजे यांचे पक्षात काय योगदान आहे असे त्यांनी विचारले. उदयनराजे पक्षात आले आणि पडले. त्यांना त्यांचा भाऊ वगळता इतर आमदारही निवडून आणता आला नाही असा टोलाही काकडे यांनी लगावला आहे. यामुळे आता काकडे यांनी उदयनराजे यांच्या संभाव्य उमेदवारीला विरोध केल्याने भाजपमधील मतभेद जगासमोर आले आहेत.

Exit mobile version