Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उटांवद येथील चंद्रकांत पाटील यांचे गुजरातमध्ये अपघाती निधन

यावल,  प्रतिनिधी ।  यावल तालुक्यातील उंटावद येथील रहिवासी  आणि  हल्ली गुजरात येथे वास्तव्यास असलेले चंद्रशेखर मधुकर पाटील यांचे अपघाती मृत्यु झाल्याची घटना घडली असून त्यांचा अत्यंविधी उटांवद करण्यात येणार आहे.

 

याबाबतचे वृत्त असे की , चन्दशेखर मधुकर पाटील (रा. उंटावद ता. यावल व हल्ली मुकाम बडोदा गुजरात)  यांचे दि. ४ जुलै २०२१रोजी सकाळी ९  वाजता त्यांच्या मोटरसायकलला डंपरने धडक दिल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला.  ते आपल्या कामानिमित्ताने बडोदा शहरापासुन ५० किलोमिटर लांब असलेल्या डाभोईकडे आपल्या मोटर सायकलने जात असतांना डाभोई गावाजवळ एका डंपरने मागुन धडक दिल्याने भीषण अपघात झाला. चंद्रशेखर पाटील  यांची जन्मभुमी उटांवद असून  , ते मधुकर भास्कर पाटील यांचे मुलं होते.   पाटील हे एका मोठ्या  खाजगी कंपनी नोकरीसाठी ११ वर्षांपासून आपल्या कुटुंबासह बडोदा ( गुजरात ) येथे स्थायीक झाले होते.  चंद्रशेखर पाटील हे मागील आठवडयातच आपल्या आई वडीलांच्या भेटी घेवून गेले होते.  त्यांच्या अशा दुदैवी निधनाने गावात शोककळा पसरली आहे.  त्यांचा  उद्या सकाळी ९ वाजता त्यांच्यावर उंटावद येथे अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे . चंद्रशेखर पाटील यांच्या पश्चात आई , वडील ,पत्नी, भाऊ, बहीण, मुलगा , मुलगी असा परिवार आहे.

Exit mobile version